एस एस सी बोर्ड परीक्षेत मुलींची बाजी

फलटण टुडे ( फलटण दि २० मे २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण च्या सन २०२४/२५ चा इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षामध्ये विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले व यशाबरोबर च मागील वर्षीप्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षामध्ये परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी ६६२ यामध्ये एकूण ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये १८७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली , १९६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली,१८९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली तर ६६ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली. व विद्यालयाचा एकूण निकाल ९६.३७%इतका लागला
या निकालात मुलींनी बाजी मारली असून इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक व त्यांची टक्केवारी पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक कु.अनुष्का अमोल सपाटे ९६.८०% , कु. आर्या दादासाहेब साळुंखे ९६.८०% कु. स्नेहा सुनील नाळे ९६.८०% यां तीघींनी प्रथम क्रमांक सयुक्तपणे मिळाला तर द्वितीय क्रमांक चि अमन नवाज मनेर ९५.८०% याने मिळवला व तृतीय क्रमांक कु श्रावणी सतीश जाधव ९५.६०% प्राप्त करत मिळाला
वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण -कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो-खो असोसिशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एजुकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा.दिलीप राजगुडा , सहायक तपासणी अधिकारी मा.सुधीर अहिवळे,मा.प्राचार्य शेडगे ,ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य मा.सोमनाथ माने,पर्यवेक्षिका माध्यमिक सौ पूजा पाटील,फलटण एजुकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
