बारामती एमआयडीसी मध्ये पर्यावरण दिन साजरा

वृषारोपन करताना हनुमंत पाटील, विजय पेटकर,अमोल धायगुडे व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची दि ६ जून २०२५):-
पर्यावरण रक्षण हे प्रत्येकाची जबाबदारी असून येणाऱ्या पिढीसाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे,संगोपन करावे व निसर्गाशी मैत्री करावी आणि वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील यांनी प्रतिपादन केले
गुरुवार दि.०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्त
बारामती कॅटल फीड्स कंपनीच्या वतीने बारामती औद्योगिक वसाहत मधील महावितरणच्या ३३ केव्ही सबस्टेशन व वन विभागाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बारामती औद्योगिक वसाहत चे कार्यकारी अभियंता विजय पेटकर, फायर स्टेशन इनचार्ज सुनील इंगोले ,महावितरण कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश जमाले, सहाय्यक अभियंता राजेश भगत,उपकेंद्र प्रमुख सचिन सावंत, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे,वनपाल संतोष उंडे, वनरक्षक संतोष जराड, एस एन गलांडे, बारामती कॅटल फीड्स चे प्रकल्प प्रमुख सुनील खोमणे, एच. आर. व्यवस्थापक अमोल धायगुडे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन राज्य कोषाध्यक्ष कल्याण धुमाळ व कर्मचारी उपस्तीत होते.
बारामती कॅटल फीड्स चे चेअरमन सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली
एमआयडीसी मधील प्रत्येक छोट्या मोठ्या कंपनी समोर वृषारोपन व मागेल त्या कंपनीस वृषरोपन करून देणे हे बारामती कॅटल फीड्स चे कार्य कौतुकास्पद असल्याचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांनी सांगितले.
झाडे लावा ,झाडे जगवा हे काम करताना बारामती औद्योगिक पट्ट्यात साडेतीन हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार असून त्यांची वाढ होईपर्यंत पूर्णपणे संगोपन करण्यात येणार असून हरित, पर्यावरण पूरक एमआयडीसी होण्यासाठी बारामती कॅटल फीड्स कार्य करणार असल्याचे अमोल धायगुडे यांनी सांगितले.
आभार सुनील खोमणे यांनी मानले
