
उदघाटन करताना मान्यवर व सोबत वारी सोलर एनर्जीचे अधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०८ जून २०२५):-
सोलर च्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम दर्जा आणि गुणवत्ता देण्यासाठी वारी एनर्जी कंपनी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वारी एनर्जी कंपनीचे पुणे विभाग प्रमुख श्रीकांत मुथाल यांनी प्रतिपादन केले.
गुरुवार दि.०५ जून रोजी सर्वेश सोलर इंडस्ट्रीज यांच्या वतीने वारी एनर्जी लिमिटेड या कंपनीचे आउटलेट बारामती इंदापूर दौंड या तालुक्यांसाठी बारामती शहरातील भिगवन रोड या ठिकाणी सुरू करण्यात आले याचा उद्घाटन समारंभ प्रसंगी श्रीकांत मथल बोलत होते
याप्रसंगी बारामती दूध संघ चेअरमन संजय कोकरे, व्हा. चेअरमन दत्तात्रय वागवे, मराठा सेवा संघ अध्यक्ष नामदेवराव तुपे, खरेदी विक्री संघ चेअरमन अँड रवींद्र माने व सोनवडी चे चेअरमन फत्तेसिंग गोडगे आणि
सागर कोंढाळकर, सतीश हजारे, रंजीत बागल ,महेश शिपकुले,प्रमोद खराडे, अशोक निंबाळकर, किरण मोरे ,अब्दुल सय्यद ,सागर भोसले, अभिजीत खटाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
वारी सोलर एनर्जी कंपनीचे सोलर पॅनल, इन्वर्टर, केबल, वॉटर हीटर, बॅटरी आदी वस्तूची विक्री व विक्री पश्चात सेवा देणार असून सोलर क्षेत्रातील भारतातील अग्रणीय वारी सोलर कंपनी मुळे ग्राहकांना फायदा होणार असल्याचे प्रास्ताविक मध्ये सोमनाथ मोरे यांनी सांगितले.
या प्रसंगी ऍड रवींद्र मोरे यांनी युवा उद्योजक यांचे कार्य व ग्राहकांना सेवा देणे उल्लेखनीय असल्याचे सांगितले
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार ओंकार वायसे यांनी मानले