
राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी जनहित प्रतिष्ठानच्या क्रीडा शिक्षक सचिन नाळे व खेळाडू कु. ज्योतिर्मयी शिंदे (कर्णधार), कु. वैष्णवी साबळे,कु. मधुरा कुंभार, कु. सृष्टी गावडे, कु. मानवी कुंभार याना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि.१४ जून २०२५):- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित 18 वर्षे वयोगट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक १४ ते १७ जून २०२५ या कालावधीत बालेवाडी(पुणे) या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून कबड्डीचे संघ आलेले आहेत. या स्पर्धेसाठी जनहित प्रतिष्ठान संस्थेतील ज्योतिर्मयी शिंदे (कर्णधार), वैष्णवी साबळे, मधुरा कुंभार, सृष्टी गावडे, मानवी कुंभार या पाच खेळाडूंची नंदुरबार जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
तसेच जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सचिन नाळे सर यांची नंदुरबार जिल्ह्याच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष मा. किशोर कानिटकर, माध्यमिकचे उपाध्यक्ष मा. ऋषिकेश घारे सर , प्राथमिकचे उपाध्यक्ष मा. किरण शेठ वाडीकर, समन्वयक किशोर शिवरकर, सचिव सतीश गायकवाड, खजिनदार सतीश धोकटे, संचालक धनंजय क्षीरसागर, सर्व संचालक, आचार्य हनुमंत दुधाळ, प्रशालेचे मुख्याध्यापक अतुल कुटे, बालभवन प्रमुख निलेश भोंडवे यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक सचिन नाळे सरांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

