‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ च्या विचाराची गरज : शिवाजी तांबे

सक्सेस कोड अकॅडमी च्या वतीने नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सन्मान

सिद्धीq बडे* *नीट परीक्षेत राज्यात पहिली व देशात तिसरी.

नीट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मान्यवर व मध्यभागी सिद्धी बडे आणि संचालक भुजबळ, येळे व इतर

फलटण टुडे (बारामती दि २२ जून २०२५):-
ज्ञानवंत व गुणवंतांचा सन्मान करणे ही भारताची संस्कृती व परंपरा आहे
त्यामुळे वैदकीय क्षेत्रातील गुणवतांचा सन्मान ही कौतुकास्पद बाब आहे . भारतात व जगात कोठेही जावा परंतु रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करावे व वैदकीय क्षेत्राचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षण संचालक व बालभारती चे मा. अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी केले.
बारामती येथील सक्सेस कोड अकॅडमी च्या वतीने नीट २०२५ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी शिवाजी तांबे उपस्तीत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मार्गदर्शन करत होते
या प्रसंगी सक्सेस कोड अकॅडमी चे संचालक ए. पी. भुजबळ, डॉ. विराज येळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, प्रा. राजकुमार कदम , डॉ प्रशांत मांडण,डॉ उज्जवल हिंगणे, कृष्णा कुदळे ,बाळासाहेब काळे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
लातूर, कोटा,दिल्ली,मुबंई नंतर बारामती ग्रामीण भाग असून सुद्धा विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने नीट परीक्षेसाठी बारामती ला पसंती देतात याचे खरे श्रेय विद्यार्थी च्या परिश्रम बरोबर शिक्षकांचे योग्य व प्रेरक मार्गदर्शन यास जात असल्याचे प्रा. राजकुमार कदम यांनी सांगितले.
पालकांपेक्षा शिक्षकांनी वर्षभर घेतलेले कष्ट व योगदान म्हतपूर्ण असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.
शिक्षण,अभ्यास,प्रश्न पत्रिका सोडवण्याचे तंत्र परीक्षा काळातील ताण तणाव यावर मात व प्रत्येक विद्यार्थ्यांस डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट घेत असल्याचे सक्सेस कोड अकॅडमी संचालक ए. पी. भुजबळ, डॉ. विराज येळे यांनी सांगितले.
नीट ची परीक्षा बिकट असते परंतु शिक्षकांचे योग्य ,अचूक मार्गदर्शन,सराव सातत्य मुळे परीक्षा सोपी गेली त्यामुळे यश मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार डॉ विराज येळे यांनी मानले.

चौकट:
नीट परीक्षेत सक्सेस कोड अकॅडमी बारामतीची सिद्धी बडे मुलींमध्ये देशात तिसरी व राज्यात पहिली येण्याचा मान म्हणजे बारामती च्या इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी करताना प्रचंड उत्साह आणि तू जिकणारच असा आत्मविश्वास सक्सेस कोड अकॅडमी ने दिल्यामुळे यश मिळवता आले:


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!