
योग प्रत्यशिक करताना विद्यार्थी व शिक्षक
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २२ जून २०२५):-
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया इंग्लिश मिडियम स्कूल कटफळमध्ये राष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये प्री प्रायमरी तसेच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
यामध्ये भक्ती शिंदे, श्रेया चव्हाण, परी रामटेके, रवंती मोडक, गायत्री मोडक, साधना ढेकळे यांनी योगा गाण्यावर प्रात्यक्षिक सादरीकरण केले तसेच स्वरूपा खंडागळे, सिद्धी काळे अनुष्का सोनवणे , धनश्री खंडागळे यांनी मंचावर योगासने प्रात्यक्षिके करून दाखवले. तसेच सानवी पुणेकर, आराध्या ढेरे यांनी योग दिना विषयी माहिती सांगितली. योगाच्या मानसिक व शारीरिक आणि अध्यात्मिक फायद्याबद्दल जागृतता पसरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक संचालनाचे प्रकार शरीराची लवचिकता वाढविणारी आसने सर्व, फुफुसाची कार्यक्षमता वाढवणाऱ्या प्राणायामाची प्रारंभिक ओळख, मनाची एकाग्रता वाढवणाऱ्या ध्यानाची तोंड ओळख, ओंकाराच्या स्पंदनाचा अनुभव व शरीरातील ताणतणाव समूळ नष्ट करणारी शवासाने मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांनी करून दाखविली.