कमिन्स कंपनीमधील सायबर तज्ञाकडून मार्गदर्शन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २६ जून २०२५):-फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे बुधवार, दिनांक २५ जून २०२५ रोजी इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “सायबर सिक्युरिटी” या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी फलटण (सुरवडी )येथील कमिन्स कंपनीमधील तज्ञ मार्गदर्शक श्री. सुशांत अहिवळे आणि श्री. सचिन काळूखे यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे मार्ग, सोशल मीडियाच्या धोक्यांची जाणीव व त्यावर उपाय याविषयी सखोल व उपयुक्त अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला व त्यांच्या समस्या आणि अनेकमनात निर्माण झालेले प्रश्न विचारून संवाद साधला.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे यांनी यावेळी सांगितले की सायबर जागरुकतेचे महत्त्व व त्यातून होणारी आर्थिक फसवणूक यातून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी आपण केलेले मार्गदर्शनाचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. विद्यार्थ्यांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील महत्त्व वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

या कार्यक्रमाला ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने, शिक्षक प्रतिनिधी,विविध विभागाचे विभाग प्रमुख व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग आणि कला , विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविकश्री. अभिजीत माळवदे यांनी केले तर श्री. मनोज ढावरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.