मुधोजी हायस्कूल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने,विशाल शिंदे ,सुधाकर वाकुडकर व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ जून २०२५):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे झाला.या दिवसाचे औचित्य साधून गुरुवार दि २६ जून २०२५ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशालेचे प्राचार्य मा.श्री. वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री.सोमनाथ माने यांची उपस्थिती लाभली. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रशालेच्या उपशिक्षिका कु. तृप्ती शिंदे यांनी आपल्या मनोगतात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा, शिक्षणासाठी दिलेल्या भरीव योगदानाचा व समतेसाठी लढलेल्या संघर्षाचा उजाळा करून दिला.

तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे यांनी मार्गदर्शनपर बोलताना छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातील शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांची सांगड आजच्या काळातील विद्यार्थात रुजवण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रातील भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकान वरती आली आहे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थीत वर्गास केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वनिता लोणकर यांनी केले तर श्री सुधाकर वाकुडकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!