
शहरातून दिंडी च्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता माहिती देताना विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २८ जून २०२५):-
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, बारामती येथे दि. २८ जून २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिपूर्ण वातावरणात दिंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य रामचंद्र वाघ यांनी केले, तर संस्थेचे संचालक नामदेव लडकत व गणेश लडकत यांनी प्रमुख उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
दिंडीची सुरुवात संभाजीनगर ते सूर्यनगरी या मार्गावर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंग व अभंग गायनाच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली. “ज्ञानोबा माऊली, तुकाराम” च्या जयघोषाने परिसर भक्तिभावाने गजबजून गेला.
कार्यक्रमादरम्यान संचालक दत्तात्रय लडकत यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच उपस्थित पालक यांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच, रिंगण सोहळा, फुगडी, व अभंग गायन या पारंपरिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जाणीव आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
अध्यात्म व विज्ञान च्या माध्यमातून पर्यावरण पूरक दिंडी ,स्वच्छता आदी विषय ची विद्यार्थ्यांना माहिती व्याहवी म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संचालक नामदेव लडकत यांनी सांगितले.