पालखी सोहळ्याबरोबर प्रमुख आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरला शिक्षण विभागाने तयार केलेला ‘साक्षरतेची वारी’ उल्लास – नाव भारत साक्षरता कार्यक्रमासाठी चा फिरता चित्ररथ

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३० जून २०२५):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शिक्षण संचालनालय योजना, पुणे आणि जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी साक्षरतेची’ या विशेष उपक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील जिंती नाका येथे साक्षरतेच्या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.
या उपक्रमात दिवसभरात तरडगाव , फलटण व बरड पालखी मार्गा दरम्यान असाक्षर व्यक्तींची नोंदणी लिंकद्वारे किवा ऑफलाइन फॉर्मद्वारे फलटण शहरातील व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आणि विविध शिक्षण संस्थांच्या मदतीने पालखी सोहळ्यातील दिंडीमधील वारकरी लोकांमधून असाक्षर व्यक्तींची माहिती संकलित करून ती ऑनलाइन पद्धतीने किवा ऑफलाइन पद्धतीने अपलोड करण्यात आली तसेच यावेळी शिक्षकांच्या मदतीने घडीपत्रीका वाटप करण्यात आले तसेच यावेळी साक्षरेरते वरती घोषवाक्य, साक्षरतेची गाणी, गवळणी यांच्या माध्यमातून जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यात आला. श्री. साबळे सर यांच्या साक्षरतेविषयक गीतांनी वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. व वारकऱ्यांना त्यांच्या गाण्यावरती ठेका धरला आणि अश्या प्रकारे साक्षरतेचा संदेश सहज आणि प्रभावीपणे पोहोचवण्याचे मोठे कार्य या दिंडीद्वारे घडून आले.
‘वारी साक्षरतेची’ या विशेष उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषद योजना शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सरक साहेब, भुजबळ सर, साबळे सर, साबळे मॅडम तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय गटशिक्षणाधिकारी श्री. संकपाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मठपती साहेब, श्री. निकाळजे साहेब, श्री. पारसे साहेब, श्रीमती वर्षा गायकवाड, श्रीमती माने-जाधव मॅडम,रवींद्र कोकरे सर आणि सर्व केंद्रप्रमुख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. भोसले सर, खरात सर, शिंदे मॅडम, गुजर मॅडम, झेंडे मॅडम, शुभांगी शिंदे मॅडम,रूपेश शिंदे ,सौ माधुरी सोनवलकर यांच्या गायनातून वारकऱ्यांना मंत्रमुग्ध करत साक्षरतेचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. त्यांच्या सादरीकरणामुळे वारी साक्षरतेचा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. निकाळजे साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी, फलटण), तालुका समन्वयक सौ. दमयंती कुंभार मॅडम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे सर, उपप्राचार्य सोमनाथ माने सर, मालोजीराजे विद्यालयाचे प्राचार्य संजय वेदपाठक सर, मनोज कदम सर, उत्तमराव घोरपडे सर, योगेश भिसे सर यांचे विशेष सहकार्य लाभले .
अश्या प्रकारे ‘वारी साक्षरतेचा’ हा उपक्रम आनंदी, उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.