किर्लोस्कर फेअर्स च्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत

किर्लोस्कर फेअर्स कंपनी च्या वतीने स्वागत करताना पदाधिकारी

फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची दि ३० जून २०२५):-
संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा पालखी सोहळा बारामती येथे शनिवार दि.२८ जून रोजी आल्यावर बारामती एमआयडीसी येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड बारामती आणि कामगार संघटना व सोसायटी यांच्या वतीने वारकऱ्याचे स्वागत करून खाद्यपदार्थ व पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या.
या प्रसंगी कंपनीचे प्लांट हेड तनेश धिंग्रा सौ मीना धिंग्रा , ई.आर.डिपार्टमेंटचे हेड अतुल कोटांगळे , विशाल शिंदे, राकेश आवटे आणि संघटनेचे अध्यक्ष- कल्याण कदम,जनरल सेक्रेटरी -गुरुदेव सरोदे,उपाध्यक्ष- शिवाजीराव खामगळ, खजिनदार- नानासाहेब भगत,सल्लागार- हनुमंत बाबर,सुरेश दरेकर, सदस्य -प्रकाश बरडकर,आप्पासाहेब होळकर, संजय कचरे,सोसायटीचे चेअरमन- सुधीर भापकर, सचिव -राजेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्तीत होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!