
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १ जुलै २०२५) : सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात आली आहे. या दुकानांसाठी इच्छुकांनी 30 जुलैपर्यंत अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
यामध्ये सातारा तालुका गावे ८ व शहरी ठिकाणे ०३, वाई तालुका – गावे-१५, कराड तालुका गावे- ६, महाबळेश्वर तालुका-४४, कोरेगाव तालुका -१३, खटाव तालुका-१०, फलटण तालुका ४, पाटण तालुका-१९, माण तालुका- ४, खंडाळा तालुका-७, जावली तालुका- ८ अशा एकूण १४१ गावे ठिकाणांचा समावेश आहे.
तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करावयाचे आहे त्यांनी संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असेही श्रीमती राजमाने यांनी कळविले आहे.
