
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०५ जुलै २०२५):-येथील मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण येथील महाविद्यालयाच्या प्रा. प्राचार्यपदी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.बी. डी. काळे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा. बी.डी.काळे यांनी माजी प्रा. प्राचार्य यांच्याकडून प्राचार्य पदाचा पदभार संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारला. प्रा.बी.डी.काळे सर हे गेल्या. अनेक वर्षापासून महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.विद्यार्थीचे प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. अशी विविध पदे त्यांनी यापूर्वी भूषविली आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्वांनी प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा.बी.डी.काळे सर यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. संस्थेने आपणावर दिलेली जबाबदारी ओळखून आपण महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये सदैव हातभार लावू असे प्रतिपादन नूतन प्राचार्य प्रा.बी.डी.काळे सर यांनी केले.