
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०६ जुलै २०२५):-१जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर्स डे व कुषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर्स डे निमीत्त जैन सोशल ग्रुप फलटण मार्फत फलटण मधिल सन्माननीय डॉक्टरांचा शाल – श्रीफळ-मोती माळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष JSGianश्री.मंगेशशेठ दोशी होते.प्रमुख पाहुणे म्हणून MaRC व्यसनमुक्ती कमीटी कनवेनर JSGian श्री. डॉ.सूर्यकांत दोशी होते. जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्री. श्रीपाल जैन,सचिव सौ.निना कोठारी,संचालक श्री.डॉ.मीलींद दोशी,इव्हेंट चेअर पर्सन श्री. तुषार शहा,माजी अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी, भुता हॉस्पिटल चे सर्वेसर्वा श्री.डॉ.निनाद भुता,सौ.पुजा भुता यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी डॉक्टर श्री.निनाद भुता,श्री. मीलींद दोशी,श्री.अलोक गांधी,सौ.शिल्पा गांधी,श्री.गुंजन गांधी,श्रीसूर्यकांत दोशी,श्री.प्रीतेश दोशी ,श्री.ऋषिकेश राजवैद्य ,कु.ऐश्वर्या भुता या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कुषी दिना निमित्त निवृत्त कृषी अधिकारी श्री.तुषार शहा व प्रसिद्ध बागायतदार श्री.मंगेशशेठ दोशी याचां सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात JSG अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन यांनी जैन सोशल ग्रुप च्या सामाजिक कार्या बद्दल माहीती देऊन डॉक्टर्स डे व कुषी डे निमीत्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर म्हणजे भुतलावरील देवदुत असल्याचे नमुद केले तसेच शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याचे नमुद केले.
डॉक्टर श्री.निनाद भुता व श्री.तुषार शहा यांची समयोचित भाषणे झाली व सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले .भुता हॉस्पिटल मधे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्र संचालन JSG माजी अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी यांनी केले.आभार प्रदर्शन JSG सचिव सौ. निना कोठारी यांनी केले.