
महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड झालेल्या महिला खेळाडू डावीकडून कु निकिता वेताळ कु. श्रेया चव्हाण कु अनुष्का केंजळे व कु . वेदिक वाघमोरे
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०७ जुलै २०२५):– हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने रांची येथे दी. ७ ते१५ जुलै या कालावधीमध्ये हॉकी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी हॉकी महाराष्ट्राच्या वतीने स्पर्धापूर्व ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेपूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी दि ०७ जुलै रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पाच महिला खेळाडू कु निकिता वेताळ, कु श्रेया चव्हाण, कु अनुष्का केंजळे, कु तेजस्विनी कर्वे व कु वेदिका वाघमोरे यांची निवड झाली होती.
या सराव शिबिराच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या महिलांसंघाची अंतिम निवड करण्यात आली. त्यामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या चार महिला खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान मिळवले.
यामध्ये कु निकिता वेताळ कु श्रेया चव्हाण कु अनुष्का केंजळे यांनी सलग तीन वर्ष महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळून सातारा जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला आहे.
या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्राच्या संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे व एन आय एस हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्री बी बी खुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघात निवड झालेल्या महिला खेळाडूंचे व त्याना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा.सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, सदस्य श्री महादेवराव माने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम ,तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा,सहायक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे, उपप्राचार्या सौ शुभांगी बाबर, माध्यमिक पर्यवेक्षक श्री रावसाहेब निंबाळकर, पर्यवेक्षक श्री निंबाळकर, माध्यमिक पर्यवेक्षक श्री राजेंद्र नाळे, पर्यवक्षिका सौ पूजा पाटील,फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सदस्य, सर्व क्रीडा शिक्षक व शिक्षक वृंद यांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट :-
महाराष्ट्राच्या १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये सलग दोन वर्ष कर्णधार पद भूषवणारी कु वेदिका वाघमोरे हीने पहिल्यांदाच संघटनेच्या सब ज्युनिअर महिला हॉकी संघामध्ये आपले स्थान कायम राखले आहे. महाराष्ट्राच्या संघामध्ये वयाने सर्वात लहान खेळाडू म्हणून तिने बहूमान मिळवला आहे. सातारा जिल्ह्या, फलटण तालुका तसेच फलटण एज्युकेशन सोसायटी च्या क्रीडा क्षेत्रामधील इतिहासात आणखी एक मानचा तुरा तिने रोवला आहे.