
प्रशिक्षक टी. बाकी राज सह चिंतामणी राऊत
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०७ जुलै २०२५):-
कर्नाटक दावणगिरी येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत येथील चिंतामणी बाळासाहेब राऊत याने सुवर्णपदक पटकावले. पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. चिंतामणीने विशेष मुलांच्या त्र्यान्नव किलो वजन गटातून या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्याने स्कॉट प्रकारामध्ये १६० किलो, बेंच प्रकारात ९२.५० किलो तर डेड प्रकारात १८५ किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले. या यशस्वी कामगिरीबरोबरच त्याने ‘स्ट्रांग मॅन’ हा किताबही पटकावला. या वर्गामध्ये देशभरातून एकूण तीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र स्पेशल ऑलिम्पिकच्या चेअरमन मेघा सोमय्या, तसेच, डॉ. भगवान तलवारे, अशोक नांगरे, टी. बाकीराज (पांडेचेरी) व वडील बाळासाहेब राऊत यांनी चिंतामणीला मार्गदर्शन केले.
चिंतामणी याने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसह कलकत्ता येथे झालेल्या स्पेशल नॅशनल
९३ किलो वजनी गटातून केले महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे.
पॉवरलिफ्टिंग, आयपीएफ वॉल्ड स्पेशल ऑलिंपिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३ व आशियाई सब ज्युनिअर, ज्युनिअर, ओपन आणि मास्टर्स स्पेशल ऑलिंपिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली आहेत.