
म ए सो शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करताना शिक्षक व विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ११ जुलै २०२५):-
म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळेत मातृ-पितृ पूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरुवार दि १० जुलै रोजी म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सरस्वती पूजन व व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्याला शिकवणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु असते व या गुरूंना स्मरून आपण आपल्या आयुष्यातील वाटचाल करून पुढे जाऊन यशस्वी व्हायचे असते. व त्या प्रत्येक गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जात असल्याचे
मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे यांनी सांगितले.
गुरु शिष्याच्या जोड्या करून त्यांची ओळख मुलांना करून देण्यात आली. सर्व बालमित्रांनी शाळेत आयोजित उपक्रम मातृ पितृ पूजन व पाद्यपूजा करून गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या जीवनातील प्रथम गुरू आपले आई बाबा यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यात आला.
गुरुपौर्णिमेपासून शाळेमध्ये कथामाला या उपक्रमास प्रारंभ झाला.तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील कृतज्ञता निधी अभियानास प्रारंभ करण्यात आला.शाळेप्रती कृतज्ञता निधी समर्पण सोहळा कार्यक्रमास पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.मोठा गट अबोली या वर्गातील विद्यार्थ्यांनी श्रावणबाळ हे नाटक सादर केले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या उपक्रमास शाळा समिती अध्यक्ष अजय पुरोहित , महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच संस्थेचे सर्व मा. सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अनिता तावरे आदी उपस्तीत होते.