विद्या प्रतिष्ठान चे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १२ जुलै २०२५):-
शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5वी)मध्ये विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील एकूण सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
सहा विद्यार्थ्यांपैकी चि.सर्वेश पद्माकर धर्माधिकारी याने 300 पैकी 282 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 9 वा क्रमांक मिळवला. चि.श्लोक विनायक देवकाते 258, चि.आदित्य लहू मुंडे 252, कु.अनुष्का सुरेश नवले 250 गुण, चि.शार्दुल सुभाष शिंदे 244 गुण, चि.दर्शन शहादेव अवंतकर 242 गुण.
वरील विद्यार्थ्यांमधील चि.सर्वेश पद्माकर धर्माधिकारी आणि चा चि.आदित्य लहू मुंडे या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय येथे देखील निवड झाली आहे.वरील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली.
संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक श्री.यादव पी आर,उपमुख्याध्यापक श्री कोरे पी एम, पर्यवेक्षक श्री. रकटे एन बी,श्री.चांदगुडे वाय ए तसेच इतर शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले.सौ. मलगुंडे एस ए,श्री.चव्हाण सचिन ,सौ.पवार ए आर,श्री.कोकाटे आर बी ,सौ नेवसे , सौ.जाधव हर्षदा,सौ.जाधव वर्षा,सौ.उत्पात एस एस ,सौ.परकाळे,सौ.पवार पी,सौ.चौधर पी ,सौ.काटे ए एच यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!