
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ जुलै २०२५):-
यावेळी वाद्यपूजन सराव शुभारंभासाठी सराफ व्यावसायिक मा गणेश जोजारे अखिल मंडई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष निलेश धालपे, युवा नेते प्रतीक ढवान पाटील, निवासी शाळेतील धनश्री निंबाळकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते वाद्यपूजन होऊन श्रींची आरती करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व शुभेच्छा परमनोगत झाले
बारामती येथील श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान वाद्य पथकाने एक सामाजिक बांधिलकी जपत ज्यांना आधार नाही त्यांना आपला प्रेमाचा हात द्या माणुसकी पेक्षा मोठे दान काही नाही याच उक्ती प्रमाणे वाद्यपूजनाचा अनाठायी अनावश्यक खर्च टाळून तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून समाजापासून वंचित असलेल्या करा वाघज निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान केले व लहानग्यांचा शुभाशिर्वाद घेऊन १२ व्या वर्षीचा वाद्य पूजन सरावाचा शुभारंभ केला
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची वाद्यपूजनाची सेवा खऱ्या अर्थाने चालू झाली यावेळी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान पथकातील मुले व मुली सर्व वादक प्रतिनिधी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिवछत्रपती प्रतिष्ठान वाद्यपथक दरवर्षी रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान असे समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने करत असतं