महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

 फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१९ जुलै २०२५):- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या   मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने   नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पॉश अॅक्ट, पिडीत नुकसान भरपाई योजना तसेच समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अॅड. मनिषा बर्गे, अॅड, सुचिता पाटील, सहाय्यक लोकअभिरक्षक कार्यालय सातारा तसेच सर्व प्रशिक्षक व आयोजक उपस्थित होते. 
कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर यांनी पिडीत नुकसान भरपाई योजना, नालसा योजना या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर अॅड. मनिषा बर्गे यांनी पॉश अॅक्ट २०१३ (महिलांचा लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा, २०१३) या विषयी माहिती दिली. तर अॅड. सुचिता पाटील यांनी समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता या विषयी माहिती दिली.  

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!