
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.२३ जुलै २०२५):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रकिा धान्य आणि इतर लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण 2 लाख 81 हजार 48 शिधापत्रिकाधारकांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता अंतिम मुदत दिलेली आहे. ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे शिधापत्रिका निष्क्रिय केले जाऊ शकते. ई-केवायसी न झाल्यामुळे एखाद्या लाभार्थीला धान्यापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी सबंधित शिधापत्रिका धारकांची राहील.

