
फलटण टुडे वृत्तसेवा, दि. ०५ ऑगस्ट२०२५) :-फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक तसेच कर्तव्यावर रुजू असलेले पण सध्या सुट्टी निमित्त गावी आलेले सैनिक बांधव यांना विद्यालयाने पत्राद्वारे निमंत्रण देऊन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास पंधरा आजी-माजी सैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत स्वागतगीताद्वारे व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोफणेयांनी केले तर पर्यवेक्षक राजेंद्र नाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
संपूर्ण देशाचे रक्षण हे सीमेवर लढणारे सैनिकांच्या हाती असल्यामुळे. सैनिकांच्या देश प्रेम व निष्ठेमुळेच देशातील प्रत्येक नागरिक मुक्तपणे श्वास घेत असतो सैनिकांच्या या देश प्रेमासाठी एक कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात बोलवून त्यांचे औक्षण करून त्यांच्या हातावर राखी बांधणे व सीमेवरीलकर्तव्यास असलेल्या सैनिक बांधवांना सणानिमित्त राख्या पाठवणे व त्यांच्या प्रती आदर भाव व्यक्त करणे यासारखा स्तुत्य उपक्रम सर्व विद्यालयात साजरा केला गेला पाहिजे असे मत प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी मांडले.
माजी प्राचार्य तथा सहाय्यक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे यांनी याप्रसंगी सांगितले की देशसेवे सारखे दुसरे कोणतेही महान कार्य नाही आपण या कार्यास एक संधी किवा करियरच्या दृष्टीने पाहिले पाहिजे असे याप्रसंगी बोलताना सांगितले.
यावेळी तोफखाना हवालदार सुरेश यशवंत मुळीक यांनी शैक्षणिक जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. सैनिकांना लिहिलेल्या पत्राचे वाचन स्वरा सुनील गोडसे या विद्यार्थ्यांनी केले तर आरोही शेडगे या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीत यावेळी सादर केले.
तसेच कला शिक्षक बापूराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून त्या सैनिक बांधवाना याप्रसंगी औक्षण करून हातावरती बांधल्या.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये एयरफोर्स सार्जेंट ज्ञानदेव बाबासो नाळे, इंजिनियर हवलदार , तानाजी शिवाजी साळुंखे इंजिनियर हवालदार, तोफखाना हवालदार बाळासो ज्ञानदेव घाडगे, सिग्नल कोर नाईक सुरेश यशवंत मुळीक , माणिकराव जितोबा खलाटे, इंजिनिअर नाईक सदाशिव जयसिंग केंजळे ,मेकॅनिक जाधव रामू तात्याबा ,सिग्नल कोर नाईक कैलास बबन ठणके ,शिवभक्त प्रतिष्ठान चे वैभव हनुमंत गोडसे, नाईक दत्तात्रय फडतरे, दीपक संकपाळ सुभेदार दिलीप भिसे, नायब सुभेदार चव्हाण साहेब, ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य सोमनाथ माने हे मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे आम्ही शिवभक्त परिवार महाराष्ट्र राज्य चे वैभव गोडसे यांनी यावर्षी सुद्धा या राख्या सीमेवरील सैनिकांना पोहचवण्याची जबाबदारी घेतली .
कार्यक्रमाचे नियोजन व मूळ संकल्पना सकाळ विभागातील चित्रकला विभाग प्रमुख बापूराव सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राबविण्यात आली व हा उपक्रम साजरा करण्यात आला.

हा उपक्रम पार पाडण्यासाठी अनिल यादव, संजय गोफणे, चेतन बोबडे, प्रीतम लोंढे, सुधाकर वाकुडकर, अभिजीत माळवदे , रमाकांत क्षीरसागर, सौ. वनिता लोणकरयांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व सेवकवर्ग उपस्थित होते.
यावेळी पर्यवेक्षक रावसाहेब निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

