
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २७ सेप्टेंबर २०२५)–
मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.२६ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये सातारा विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास मा.श्री.अभिजीत इंगळे,राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व माजी कर्णधार शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,प्रमुख पाहुणे म्हणून तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.पी.एच कदम हे अध्यक्षस्थानी होते .यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ.राहुल इंगळे,राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच आणि प्रा.दत्ता गायकवाड,सचिव,सातारा विभागीय क्रीडा परिषद, सातारा हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.खेळाडूंनी जिद्द चिकाटीच्या जोरावरती आयुष्यामध्ये उत्तम यश मिळवावे असे मनोगत प्रमुख पाहुणे श्री.अभिजीत इंगळे यांनी व्यक्त केले. तर विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा उत्तम पर्याय असल्याचे अध्यक्ष स्थानावरून प्रो.डॉ.पी.एच कदम सर यांनी प्रतिपादन केले.या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करून सर्व सामने रंगतदार पद्धतीने पार पडले. या सामन्यांमध्ये मुधोजी महाविद्यालयाच्या महिला संघाने अंतिम सामन्यात गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,कराड या संघाचा पराभव करून सलग पाचव्यांदा शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय व्हॉलीबॉल महिला क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या मुधोजी महाविद्यालयाच्या महिला खेळाडू संघामध्ये वैष्णवी फडतरे,श्रद्धा शिंदे,प्रतीक्षा शिंदे,संजीवनी जाधव,नूतन महाडिक,सुप्रिया निंबाळकर, ऋतिका चतुरे,आयशा जाधव,शर्वरी जाधव संध्या जाधव,स्नेहल गुंजाळ,तेजस्वी शिंदे या खेळाडूंचा समावेश होता .या विजयी संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रो.डॉ. स्वप्नील पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेचे क्रीडा समितीचे सदस्य प्रा.संकेत पाटील,प्रा.डॉ.संग्राम मोरे,प्रा. डॉ.अमरीश शेल्टे,प्रा.गिरीश पवार,प्रा.तयाप्पा शेडगे,श्री.संजय सोनार व श्री.सौरभ चतुरे व सर्व व्हॉलीबॉल खेळाडू यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.
या व्हॉलीबॉल महिला स्पर्धेच्या निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – मुधोजी महाविद्यालय,फलटण.
द्वितीय क्रमांक – गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कराड.
तृतीय क्रमांक – महिला महाविद्यालय,कराड.
चतुर्थ क्रमांक – शहाजीराजे महाविद्यालय,खटाव.
या विजयी संघाचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री.शिवाजीराव घोरपडे,प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.पी.एच.कदम यांनी अभिनंदन केले.


