
फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण दि २८ सेप्टेंबर २०२५): –
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण, मा. आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर उद्यान, फलटण यांचे सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त जेष्ठ नागरिकांसाठी नवरात्र उत्सवाच्या शुभमुहूर्तावर नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ सोमवार दि.२९.९.२०२५ रोजी सकाळी १०- ३० वाजता मा.आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर उद्यान, माळजाई मंदिर उद्यान परिसर, फलटण या ठिकाणी एम.जे.एफ. लायन डॉ. विरेंद्र चिखले, जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी रविंद्र बेडकीहाळ यांच्या शुभहस्ते होणार आहे.

यावेळी लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन सौ. निलम पाटील, लायन जगदिश करवा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण लायन महेश सांळुखे, अध्यक्ष, लायन्स क्लब फलटण, लायन निखील सोडमिसे सचिव, लायन्स क्लब फलटण, लायन स्वप्नील सोडमिसे खजिनदार, लायन्स क्लब फलटण, लायन प्रमोद निंबाळकर अध्यक्ष, माळजाई मंदिर व उद्यान समिती, लायन विजय पाटील सचिव, माळजाई मंदिर व उद्यान समिती, लायन महेश गरवालिया खजिनदार, माळजाई मंदिर व उद्यान समिती यांनी केले आहे.



