
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.३० सप्टेंबर २०२५):- सातारा जिल्हयाच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणा-या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम दि ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे होणार आहे. तरी सातारा जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.

