
फलटण टूडे वृत्तसेवा (फलटण दि ३० सप्टेंबर २०२५) :-
फलटण एज्युकेशन संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण , मुधोजी हायस्कूल कायम सेवकांची पतसंस्था फलटण, मुधोजी हायस्कूल चित्रकला विभाग व आदित्य असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या
दरवर्षी मुधोजी हायस्कूल येथे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य अशा रंगभरण चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येतात या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता .

भव्य रंग भरण स्पर्धा गटनिहाय आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये गट-अ : पाचवी, सहावी | गट-ब : सातवी, आठवी या गटात सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०८ ते १० या वेळात मुधोजी हायस्कूल च्या प्रांगणात पार पडल्या .
या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की विद्यार्थ्यांचा कलात्मक विकासाला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा वारंवार भरवणे व त्यांना व्यासपीठ उपलब्ध केल्याने त्यांच्या कुलागुणांचा विकास होतो हा विकास बालवयातच होत असतो त्यामुळे या स्पर्धेतून निश्चितच चांगले कलाकार निर्माण होतील व भविष्यात ते शाळेचे नाव उज्वल करतील तसेच यावेळी मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील महिला हॉकी संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नेहरू चषक चे विजेतेपद मिळवल्याबद्दल त्यांच्या या यशाबद्दल त्यांचेही अभिनंदन केले . चित्रकला रंगभरण स्पर्धेचे तिसरे वर्ष असल्याने त्यांनी कला विभागाचे बापूराव सूर्यवंशी, एस आर घाडगे , सतीश नाळे यांचे विशेष कौतुक केले .

यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याची संचालक महादेव माने,प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, युवा उद्योजक तुषारभैय्या नाईक निंबाळकर , प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे , उपप्राचार्य अण्णासाहेब ननावरे ,पर्यवेक्षक आर एस नाळे , आर बी निंबाळकर , सौ पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी केले तर सुत्रसंचलन सुजीत जमदाडे यांनी केले. आभार आण्णासाहेब ननवरे यांनी मानले .



