बारामती कराटे असोसिएशनचा डंका!

शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत ९ सुवर्णांसह १९ पदके – ९ खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०३ ऑक्टोबर २०२५):-
जेजुरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने पुणे ग्रामीण शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा – २०२५ उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत पुणे ग्रामीणच्या १३ तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या ७०० हून अधिक खेळाडूंनी दमदार लढती दिल्या. त्यात बारामती कराटे असोसिएशनच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी विविध शाळा महाविद्यालयकडून खेळताना ९ सुवर्ण, ३ रौप्य व ७ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई करत बारामतीचा झेंडा उंचावला.
जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ९ खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रथम क्रमांक विजेते (सुवर्ण पदक)
आयुष शंकर करळे
श्रुती शंकर करळे
राजवीर रवि गायकवाड (म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती)
गायत्री कुमार गावडे (जनहित प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालय, बारामती)
सिद्धी अविनाश महामुनी (अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल)
सिद्धी कुणाल बोरा (विद्या प्रतिष्ठान न्यू व बाल विकास मंदिर)
सिद्धी शंकर करळे (तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती)
संस्कृती दत्तात्रेय जाधव (विद्या प्रतिष्ठान मराठी मीडियम, बारामती)
अमित व्यवहारे (छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती)
द्वितीय क्रमांक विजेते (रौप्य पदक)
वेदांत संजय रनवरे
जाई सुनील भोसले
अंश ऋषिकेश गवई (म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती)
तृतीय क्रमांक विजेते (कांस्य पदक)
प्रांजल गणेश आटोळे
रुद्र किरण पारवे
प्रथमेश बाळासाहेब कुलट
कावेरी धनंजय जबडे
अनुष्का संजीव शिंगाडे (म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती)
मानस मनोज प्रजापती (अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल)
अक्सा अत्तार (झेनाबिया इंग्लिश मीडियम स्कूल, कटफळ, बारामती)
शिहान रविंद्र करळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेन्सई अभिमन्यू इंगुले, सेन्सई शिवाजी भिसे, सेन्सई तेजस कांबळे, सेन्सई अनुराग देशमुख, सेम्पई फरर्जाना पठाण, सेम्पई तेजस्विनी जगताप व सेम्पई ऋषिकेश मोरे यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी अभिनंदन केले.

Screenshot

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!