
पदक सहित जलतरणपटू वरदा कुलकर्णी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०८ ऑक्टोबर ३०२५):-
पँरा ऑलिंपिक कमिटी महाराष्ट्र राज्य आयोजित सर्व स्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे संपन्न झाल्या .
या मध्ये वीर सावरकर स्वीमर्स क्लब बारामती ची दिव्यांग जलतरणपटू वरदा संतोष कुलकर्णी हिने एस- १४
कॅटेगरी मध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली. तिने १०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर फ्री स्टाइल व १०० मीटर बॅक स्ट्रोक या तिन्ही प्रकारांमध्ये सुवर्ण पदक मिळवले. सदर स्पर्धांमधील निवड झालेल्या स्विमर्स ची नोव्हेंबर मध्ये हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा साठी निवड झाली आहे.

वरदा हिने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
वरदा ही शिवगुरू या विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांचं कार्यशाळेत शिक्षण घेत आहे. वरदा ही बारामती मधून राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणारी पहिली विशेष विद्यार्थिनी आहे. आर्यमॅन ओम सावळेपाटील व इरफान तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षन घेत असून वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे अध्यक्ष डॉ अशोक तांबे ,सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे,सल्लागार सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर व सर्व संचालक आणि शिवगुरू शाळेचे अध्यक्ष मूथप्पा व्हनकांबळे यांनी तिचे अभिनंदन केले.
चौकट: देशासाठी सुवर्ण पदक मिळवणार
ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन देशाला दिव्यांग जलतरणपटू म्हणून सुवर्णपदक मिळवून देणार या साठी कठोर सराव व विविध स्पर्धेत भाग घेत असल्याचे बक्षिस समारंभ मध्ये वरदा कुलकर्णी हिने सांगितले.



