कटफळ येथील जानाई देवी यात्रा महोत्सव साठी भाविकांची गर्दी

कटफळ येथील जाणाई देवी व मंदिर वरील रोषणाई

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०८ ऑक्टोबर २०२५):-
कटफळ येथील श्री जानाई देवी यात्रा महोत्सव प्रसंगी भाविकांनी दर्शन साठी मोठी गर्दी केली होती. यात्रा महोत्सव मध्ये पहिली माळ शुक्रवार दि.०३ ऑक्टोम्बर रोजी श्री जानाई देवीची घटस्थापना झाली

दुसरी माळ शनिवार दि.०४ ऑक्टोम्बर रोजी झाली या वेळी गाडीखेल लेझीम पथक व अंबादास गोंधळी यांचा कार्यक्रम झाला तर तिसरी माळ रविवार दि.०५ ऑक्टोम्बर रोजी संपन्न होऊन
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कटफळ आयोजित श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन झाले व चौथी माळ सोमवार दि.०६ ऑक्टो रोजी देवीचा छबिना, रात्री ८ ते ९ छबिना गाडीखेल येथील लेझीम पथक कार्यक्रम ९ ते ११ अंबादास गोंधळी यांचा कार्यक्रम झाला पाचवी माळ मंगळवार दि.०७ ऑक्टोम्बर रोजी श्री जानाई देवी यात्रा
श्री जानाई देवी महापूजा व अभिषेक होऊन पेडगाव दादा काटकर यांच्या मानाच्या काठीचा भेटीचा कार्यक्रम, १० वाजता सर्व समाज बांधवच्या आरती चा कार्यक्रम व सायंकाळी ९ ते १० काकड आरती होतील व रात्री ११ वाजता पालखी व भाकणूक कार्यक्रम झाला.


विविध गावांचे शिरवली, जैनकवाडी, पारवडी, शिर्सुफळ, गोजुबावी, तांदुळवाडी या गावांतील भाविकांनी भाग घेतला
बुधवार दि ०८ ऑक्टोम्बर रोजी
मंगला बनसोडे व नितीन बनसोडे यांच्या कार्यक्रमाने सांगता झाली.
यात्रा निमित्त खेळणी, पाळणा, विविध मनोरंजन, खाद्यपदार्थ आदीचे दुकाने यांची रेलचेल होती तर बारामती बारामती सह राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Screenshot


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!