
फलटण टुडे वृत्तसेवा (दहिवडी,दि १२ ऑक्टोबर २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी च्या नवचैतन्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गोंदवले बु || मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी च्या जोरावर जिल्हास्तरीय व विभास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोंदवले बु || येथील नवचैतन्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि विभागीय अशी मजल दर मजल स्पर्धा जिंकत आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. १७ वर्षाखालील एअर रायफल शूटिंग स्पर्धेत शिवम छबुलाल धाईंजे याने दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी कराड येथे झालेल्या जिल्हास्तरीय एअर रायफल शूटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. तर १७ वर्षाखालील तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत वीर किरण कांबळे याने प्रथम क्रमांक मिळवत त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद निकम, स्कूल कमिटी चेअरमन मा. रानडे साहेब , व्हाईस चेअरमन मा. डॉ. तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , प्रशालेचे प्राचार्य मा. खांडेकर , पर्यवेक्षक मा. श्री.भोसले , ज्येष्ठ शिक्षक श्री. कणसे , जी ए वळवी, सौरभ म्हेत्रे , डी एम वळवी,श्री गोंधे,क्रीडा मार्गदर्शक सौ. गायकवाड , सौ. वायदंडे, सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


