
फलटण टुडे वृत्तसेवा (गोंदवले,दि १३ आक्टोबर २०२५): – सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे मा. सेक्रेटरी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज, गोंदवले बु. प्रशालेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये इंग्लिश ग्रीटिंग कार्ड बनविणे स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा ,कबड्डी स्पर्धा, हिंदी हस्ताक्षर स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा ,या विविध स्पर्धांचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग नोंदविला .या स्पर्धांसाठी प्रशालेतील शिक्षक श्री. कणसे ,श्री. काकडे , संतोष तोडकर, सौ गायकवाड , सौ भांडवलकर , सौ. वायदंडे , सौ शिंदे ,कु.आळंदे यांनी नियोजन करून सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.भोसले सर आणि मुख्याध्यापक श्री.खांडेकर सर यांनी मार्गदर्शन केले.


