
श्रीमंत संजीवराजे यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रशालेत ग्रंथ तुला करताना प्रशालेचे शिक्षक वृंद व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (सस्तेवाडी,दि १६ ऑक्टोबर २०२५):-फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर ,सस्तेवाडी येथे श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर(बाबा) यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

श्रीमंत संजीवराजे यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त
श्रीमंत संजीवराजे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका अनिताराणी कुमार कुचेकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण,भोजराज नाईक निंबाळकर , महादेव माने ,तुषार नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मा. सेक्रेटरी तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर ( बाबा ) यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रशालेत ग्रंथ तुला ,शालेय दप्तरांचे वाटप, महिलांच्या विविध स्पर्धा घेतलेल्या बक्षीस समारंभ विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

श्रीमंत संजीवराजे यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शालेय दप्तरांचे वाटप करताना प्रशालेचे शिक्षक वृंद व इतर मान्यवर
तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ता यादीतील व बुद्धिबळ स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या , ओम मिलिंद नांदले याचे विशेष कौतुक करण्यात आले . मा . श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर यांनी प्रास्ताविकात मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या व ग्रंथ तुला कार्यक्रमातून त्यांनी सर्वांना खालील संकल्प दिला ,
१) विद्यार्थ्यापर्यंत ज्ञान पोहचवायचे.
२)प्रत्येक शाळेत वाचन संस्कृती वाढवायची.
३)आपल्या समाजात शिक्षणाचे महत्त्व अधिक दृढ करायचे.
हा संकल्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष फलटण- कोरेगाव मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण,शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन मा सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, शाळा व्यवस्थापन समिती व्हाईस चेअरमन मा.सौ नूतन शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा. भोजराज नाईक निंबाळकर मा. शिरिष हंबीरराव भोसले, मा. चंद्रकांत दिनकर पाटील तसेच मालोजीराजे शेती विद्यालयाचे चेअरमन मा. शरदराव रणवरे, सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा.अरविंद निकम निमंत्रित सदस्य मा.श्रीमती निर्मला रणवरे, जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण चे अधिव्याख्याते मा. डॉ. फरांदे, मा.सौ.दमयंती कुंभार तसेच युवा उद्योजक मा. तुषार नाईक निंबाळकर, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य मा. काळे , गुरुद्रोणा अकॅडमी चे संचालक मा.अविनाश नरूटे, निंबाळकर , चव्हाण , माने ,इंगवले ,पवार , सोनवलकर, मुख्याध्यापिका मा. सौ जाधव , सौ. काकडे , सौ शेख , श्रीमंत सगुणामाता बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ सावंत तसेच पंचक्रोशीतील पदाधिकारी, पालक ,मालोजीराजे शेती संकुलातील सर्व शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.


