
प्रारंभ २०२५, स्वागत समारंभ प्रसंगी मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २५ डिसेंबर २०२५):-
सद्गुरु वामनराव पै शिक्षण संस्था, कटफळ, बारामती संचलित चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी, कटफळ येथे शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या डी. फार्मसी व बी. फार्मसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “प्रारंभ २०२५” हा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी
संस्थेचे संस्थापक नानासाहेब मोकाशी, अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी, सचिव संगीता मोकाशी श्रद्धा मोकाशी , प्राचार्य डॉ. विनोद पवार,प्रसिद्ध संमोहनतज्ञ सोनाली खाडे उपस्तीत होते.
फार्मसी शिक्षणाचे महत्त्व, औषधनिर्मिती क्षेत्रातील वाढती संधी, तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम आणि नैतिक मूल्ये जोपासून अभ्यास करावा, असे आवाहन संग्रामसिंह मोकाशी यांनी केले.
विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन, एकाग्रता वाढविणे, ताण-तणाव व्यवस्थापन तसेच आत्मविश्वास वाढविण्याबाबत तंत्र व मंत्र बाबत प्रसिद्ध संमोहनतज्ञ सोनाली खाडे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने डी. व बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांमधून ‘मिस्टर फ्रेशर’ म्हणून ऋतिक गावंड व अंकित कराडे, तसेच ‘मिस फ्रेशर’ म्हणून सानिया शेख व श्रुती आटोळे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. पल्लवी कांबळे, प्रा. शुभांगी तावरे, विभागप्रमुख प्रा. हेमंत भोसले तसेच सर्व प्राध्यापकवर्ग यांनी विशेष नियोजन व परिश्रम घेतले.

