
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि २७ डिसेंबर २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण द्वारे आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शनाच् आकर्षण म्हणून जागरान गोंधळीद्वारे कृषि तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यात येत आहे, देशातील पहिले डिझेल इंजिन बनवणारी कूपर कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक ट्रॅक्टर प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरत आहे, महाविद्यालयातील देशी पोल्ट्री फार्म व लसीकरण विरहित शुद्ध देशी कोंबड्या, जिवंत गावरान कोंबडा 350 प्रति नग आणि जिवंत गावरान कोंबडी 250 प्रती नग याप्रमाणे प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे. श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनात आयोजित रक्तदान हेच महादान आणि रक्तदानानंतर रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत तसेच कुंडलिनी शक्ती जागृती व महासाक्षात्कार या विषयाचे सजग कृषि प्रात्यक्षिक व माहिती श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे, बायर क्रॉप सायन्स मोफत निमिटोड तपासणी, कृषि विभागाचा भाजीपाला, फळबाग, पिकांचे सुधारित वाण, आधुनिक शेती पद्धती तंत्रज्ञान, शेततळे, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांचे उसाची सुधारित वाण व वैशिष्ट्ये, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांचे महाविद्यालयातील अनुभवाधारीत कृषि शिक्षण द्वारे बनविण्यात आलेल्या विविध कृषि निविष्ठा, के बी क्रॉप सायन्सचे के बी चे शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खते, जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशके, रोपवाटिका लागवड मध्ये भाजीपाला, फळबाग रोपे, जगातील सर्वात बुटकी राधा म्हैस आकर्षण ठरत आहे तरी परिसरातील शेतकरी, युवक, महिला बचत गट, महिला शेतकरी बहुमोल प्रतिसाद मिळात आहे. परिसरातील 40000 शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन बहुमोल असा प्रतिसाद मिळत आहे तसेच बहुसंख्य शेतकऱ्यांनी कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात येत आहे.


