
फलटण टुडे वृत्तसेवा ( कराड, दि. २८ डिसेंबर २०२५):-
कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थी पश्चिम महाराष्ट्र सहकार परिषद- २०२५ ची परिषद २७ डिसेंबर २०२५ रोजी कराडमधे पार पडली .
यावेळी अध्यक्षस्थानी मा.खासदार श्री.नितीन पाटील होते ,(सातारा जि.बँक.अध्यक्ष) प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठता मानव्यविद्याशाखा मा..डाॅ. अनिलकुमार वावरे तर अशोकराव थोरात(मळाई ग्रुप अध्यक्ष मळाई मलकापूर_कराड ). प्रा. सतीश जंगम (समन्वयक)कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचारमंच अध्यक्ष डॉ.शरद शेटे हे मान्यवर उपस्थित होते .

यावेळी सहकार विचारमंच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते एच. एस. सी .बोर्ड कोल्हापूर विभागात सहकार विषयात चांगले गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.सिद्धी विजय गावडे हिला सहकार विषयात १०० पैकी ९६ गुण प्राप्त केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तिला सहकार विषयात मोलाचे मार्गदर्शन करणारे मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्रा.सुधाकर वाकुडकर यांना यावेळी शाल, पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र* देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवीण्यात आले


