
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २८ डिसेंबर २०२५):-अजितदादा पवार यांनी आज बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.व काही सूचना केल्या.

इंदापूर रस्ता व बस स्थानक परिसराचं सुशोभीकरण, सेंट्रल पार्क समोरील रस्त्याचं सौंदर्यीकरण, महापुरुषांच्या पुतळ्यांची कामं, स्विमिंग पूलचं प्रगतीपथावरील काम तसंच गौतम बाग ते फडतरे वस्ती या चारपदरी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

बारामती शहर आणि परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध व दर्जेदार विकास हाच मुख्य उद्देश आहे. विकासकामं वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन पूर्ण व्हावीत, यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना केल्या.


