VPKBIET बारामती येथे द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ३ डिसेंबर २०२६):-
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (VPKBIET), बारामती येथे द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी Soft Skills and Personality Development Training Program अंतर्गत विशेष मुलाखत कौशल्य (Interview Skills) प्रशिक्षण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Screenshot

या प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन प्रा. ओम्मी पिरजादे आणि प्रा. व्यंकटेश रामपुरकर यांनी केले. सॉफ्टवेअर उद्योगातील प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे व निर्णायक प्रश्न विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व व्यावसायिक पद्धतीने कसे हाताळावेत याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये तोंडी व अवतोंडी संवाद कौशल्य, श्रोत्यांशी प्रभावी संवाद, सार्वजनिक बोलणे व सादरीकरण कौशल्य, व्यावसायिक ई-मेल लेखन, आत्मविश्वास वाढवणे, वैयक्तिक सुसंस्कृतता व व्यावसायिक शिष्टाचार, तणाव व राग व्यवस्थापन, टीमवर्क, गटचर्चा तंत्र तसेच कॉर्पोरेट संस्कृतीची ओळख यांचा समावेश होता.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी मॉक इंटरव्ह्यू, मॉक ग्रुप डिस्कशन, रोल प्ले, सिम्युलेशन आणि विविध संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून प्लेसमेंटसाठी आवश्यक कौशल्यांची प्रभावी तयारी झाली.

या यशस्वी उपक्रमासाठी संगणक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरविंद जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे आदरणीय प्राचार्य डॉ. सुधीर लांडे सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम प्रभावीपणे पार पडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची व्यावसायिक तयारी अधिक सक्षम होऊन त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!