
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३ डिसेंबर २०२६) शनिवार दि. ३डिसेंबर २०२६ रोजी फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला दालनामध्ये विवध कार्यक्रमानचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे , प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार कदम , उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर व आर एस नाळे, तसेच उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी डी आर . बोंद्रे उपस्थिती होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी सावित्रीमाई या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीमाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीमाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. व सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक कार्य आणि आधुनिक सावित्री कशाप्रकारे असायला पाहिजेत याविषयी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुरुवात स्वागत गीताने झाली या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकमध्ये सौ. अश्विनी भोसले यांनी काव्यफुले या कवितेतील सावित्रीमाई यांचे विचार व्यक्त केले. तसेच यावेळी उच्च माध्यमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या योगदानाबद्दल आपले विचार मांडले.

जयंतीनिमित्त कला, वाणिज्य, विज्ञान, व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ शिक्षिका सौ.वनिता लोणकर यांनी सावित्रीमाई यांच्या जीवनावर एकांकिका सादर करून त्यांचे विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख कु. तृप्ती शिंदे व उच्च माध्यमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षकवृंद , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.तर आभार सौ धनश्री नाईक निंबाळकर यांनी मानले



