सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे निर्भया पथकाची भेट

फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड दि १० जानेवारी २०२६):-
सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक तुषार दोशी व अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती डॉ.वैशाली कडूकर मॅडम व दहिवडी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.रणजित सावंत तसेच म्हसवड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक क्रमांक ५ मधील निर्भया पथक प्रमुख श्री.तानाजी चंदनशिवे, श्री.सागर पोळ, व सौ-राजश्री खाडे यांनी आमच्या वि‌द्यालयास भेट देवून विद्यार्थ्यांना कायदेविषयी माहिती सांगून मुलींना, गुडटच-बॅडटच विषयी माहिती देवून स्वतःचे संरक्षण कसे करावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले

तसेच कोणास काही अडचण असल्यास डायल 112/1091 नंबर वरती तक्रार नोंदवण्याच्या सूचना देण्यात आले.यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री.दासरे पी.यू. उपमुख्याध्यापक श्री.यादव पी.के. तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!