मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करताना प्राचार्य वसंत शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर एस नाळे, आर बी निंबाळकर,वनिता लोणकर , निलिमा कुमठेकर व इतर

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वसंत शेडगे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १४ जानेवारी २०२६):* फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ आणि.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंत शेडगे यांनी सांगितले की, राजमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना चांगले संस्कार दिले त्यामुळे स्वराज्य उभे राहिले व युगाचार्य स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीचे लक्ष्य गाठा असा संदेश दिला व तरुण राष्ट्रनिर्मितीचे पिढीमध्ये विचार रुजवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे.असे विचार त्यांनी मांडले.

Screenshot

यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ.वनिता लोणकर यांनी शिवकालीन स्त्री व आजची स्त्री यामधील जीवनशैलीचा फरक सांगितला तर इयत्ता ११ वी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मी जिजाऊ बोलते, स्वामी विवेकानंद यांचे कार्य या विषयावर प्रभावीपणे सादरीकरण करून
त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले

यावेळी उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आर एस नाळे, आर बी निंबाळकर हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या. कु तृप्ती शिंदे व जयंती व पुण्यतिथी विभाग प्रमुख सौ. धनश्री नाईक निंबाळकर, समितीतील सदस्य सुधाकर वाकुडकर , रमाकांत क्षीरसागर , माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अश्विनी भोसले यांनी केले, तर प्रास्ताविक सौ निलिमा कुमठेकर यांनी केले. सौ खराते मॅडम यांनी आभार मानले .

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!