
मुलांचा इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास प्रत्यक्ष मैदानावर…
हा आनंद आज जनहित प्रतिष्ठान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १४ जानेवारी २०२६):-
बारामती – येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बारामती (पंचकोशाधारित गुरुकुल) हे पंचक्रोशीमध्ये उपक्रमशील विद्यालय म्हणून प्रचलित आहे. या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इतिहास आणि भूगोलाच्या अभ्यासामध्ये नकाशाला अनन्य साधारण महत्व आहे आणि हाच नकाशा जर आपण प्रत्यक्ष मैदानावर शिकलो तर त्याचा आनंद वेगळाच असतो.

हा आनंद आज जनहित प्रतिष्ठान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला. विद्यार्थ्यांना राज्याचे नाव सांगितल्यानंतर ते प्रत्यक्ष त्या राज्यामध्ये जाऊन उभा राहत होते. त्यामुळे त्यांना त्या राज्यात गेल्याचा वेगळाच आनंद मिळाला. आपल्या भारताच्या सीमारेषा कुठपर्यंत विस्तारलेल्या आहेत या प्रत्यक्ष मुलांनी अनुभवल्या आणि पुन्हा एकदा सिद्ध झाले जनहित प्रतिष्ठान विद्यालय अनुभवातून शिक्षण या मतावर ठाम आहे.

ही संकल्पना क्रीडा व इतिहास शिक्षक श्री. सचिन नाळे यांनी राबवली,भारताचा नकाशा कलाशिक्षक श्री.प्रदीप दरदरे यांनी मैदानावर काढला. भूगोल शिक्षिका सौ.राणीताई झगडे, सौ. हेमाताई सावंत,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी या संकल्पनेला सहकार्य केले.

या अनोख्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष मा. श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष मा. श्री. हृषिकेश घारे (सर), सचिव मा. श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे, व सर्व संचालक मंडळ तसेच गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.


