राज्यस्तरीय आष्टे-डू आखाडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २५ जानेवारी २०२६):-
भंडारा येथे पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, त्यांच्यावतीने राज्यस्तरीय शासकीय आष्टे-डू आखाडा (शिवकालीन मर्दानी खेळ) स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत चार खेळाडूंनी विजेतेपद मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

स्नेहल दराडे व काव्या मजगर यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले, तर शिव गायकवाड आणि श्रेयश ठोंबरे यांनी कांस्य पदकांवर आपले नाव कोरले.
ज्ञानसागर गुरुकुलचा क्रीडा विभाग केवळ स्पर्धात्मक यशापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपरिक आखाडा प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक बळकटी, शिस्त व राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यावर शाळा विशेष भर देत आहे. नियमित सराव, तज्ज्ञ क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन, आधुनिक व पारंपरिक प्रशिक्षणाचा समन्वय आणि विद्यार्थ्यांमधील

आत्मविश्वास वाढविणारे उपक्रम हे या यशाचे प्रमुख आधारस्तंभ ठरत आहेत.या यशाबद्दल बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे म्हणाले,
या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी खेळाडू, क्रीडाशिक्षक व क्रीडा विभाग व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.


