फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २९ जुलै २०२६):-
फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी पालखी सोहळ्याचे दि.१७ रोजी श्रीराम नगरी फलटण मधे आगमन झाले.
सालाबाद प्रमाणे फलटण मध्ये वारीतील वारकरी भाविकांचे स्वागत करून वारकरी भाविकांना जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने शाबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. फलटण मधिल अमित ऑटो येथे जैन सोशल ग्रुप कडुन वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजन व्यसनमुक्ती कमिटी कन्व्हेनर श्री. डॉ.सुर्यकांत दोशी,जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्री श्रीपाल जैन,सचिव सौ.निना कोठारी, खजिनदार श्री.राजेश शहा, उपाध्यक्ष श्री. प्रीतम शहा, सह सचिव श्री. हर्षद गांधी,सह खजिनदार श्री. प्रीतम गांधी,माजी अध्यक्ष श्री राजेंद्र कोठारी,सचिन शहा,संचालक डॉ.श्री. मिलिंद दोशी,श्री.धिरेन शहा,श्री.अतुल कोठाडिया , सदस्य श्री.अमित दोशी,श्री.नंदकुमार दोशी सर,श्री. राजेंद्र सवळे, श्री. राहुल गांधी, सदस्या सौ. सुजाता गांधी,सौ.योगिता दोशी, सौ.मोना गांधी,सौ.मयुरा दोशी उपस्थित होते.
खिचडी वाटप कार्यक्रम संपन्न होण्यासाठी जैन सोशल ग्रुप सदस्य श्री.अमित दोशी व परिवाराचे सहकार्य लाभले.


