फलटण कार्यक्षेत्रातील जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 21 जुलै 2026):-
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन मालकांना सूचित करण्यात येते की, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (High Security Registration Plate HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Screenshot



ज्या वाहनधारकांनी अद्याप त्यांच्या वाहनावर एचएसआरपी क्रमांक फलक बसविलेले नाहीत, त्यांनी तात्काळ अधिकृत केंद्रामार्फत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन फलटणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी केले आहे.
ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेटसाठी पैसे भरलेले आहेत, त्यांच्यावर प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवेपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही. तपासणी दरम्यान केवळ एचएसआरपी नंबर प्लेटसाठीची फी भरलेली पावती दाखवली तरीही कारवाई टाळता येईल. तरी वाहनधारकांनी कोणतीही गैरसोय अथवा दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!