मोफत केस दाढी करून अजितदादा यांची जयंती साजरी

अनोख्या आदरांजली मुळे ज्येष्ठ नागरिक भारावले ……

बोरावके वृद्धाश्रम या ठिकाणी ज्येष्ठांची मोफत दाढी कटिंग करताना आकाश पगारे व इतर

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २३ जुलै २०२६):-
बारामती शहरातील तांदळवाडी या ठिकाणी असलेल्या बोरावके वृद्धाश्रमामध्ये रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोफत दाढी व कटिंग करून स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहत आकाश पगारे या कारागीर युवकांनी’ केसांची स्वछता व डोक्यातील केसांना आजार होऊ नये ‘ या विषयी मोफत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, नगरसेवक प्रवीण माने, गोरख पारसे, मा. नगरसेवक समीर चव्हाण, बोरावके वृद्धाश्रमाचेअध्यक्ष किशोर मेहता, उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके, फकरूशेठ बोहरी, अमित बोरावके ,अभय शहा ,डॉ अजिंक्य राजे निंबाळकर डॉ, अजित आंबर्डेकर डॉ सई सातव व उद्योजक सुरेंद्र भोईटे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक किरण शेळके आदी मान्यवर उपस्तीत होते.


सुर्यनगरी मध्ये बी. ए सलून अँड टॅटूज च्या माध्यमातून व्यवसाय करताना विविध आजारामुळे सलून मध्ये ज्येष्ठ नागरिक येऊ शकत नाही म्हणून त्यांच्याच घरी जाऊन व्यवसाय करताना सदर कल्पना सुचली व उपक्रम सुरू केला
सदर उपक्रम मोफत दोन दिवस चालतो सामाजिक बांधिलकी जोपासत सदर उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून राबवित असतो या माध्यमातून ज्येष्ठाची सेवा करण्याचे भाग्य लाभते व दिखाऊ पणा न करता सामाजिक उपक्रम आवडते म्हणून मोफत दाढी कटिंग चा उपक्रम राबवित असल्याचे आकाश पगारे यांनी सांगितले.

Screenshot


उत्तम व आदर्शवत उपक्रम असून ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे वृद्धाश्रमाच अध्यक्ष किशोर मेहता यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!