चोरीस गेलेले सोने व पाण्यातील इलेक्ट्रीक मोटारी फिर्यादीला परत… पोलीसांचे कौतुक

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १ सप्टेंबर २०२६):– फिर्यादी बाळासाहेब आबासाहेब चव्हाण, रा. साखरवाडी यांचे घरामध्ये काही दिवसापुर्वी अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलीसांनी तपासाचे चक्रे फिरवनू आरोपीस निष्पन्न करुन चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले होते. आज रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत सुबनावळ, दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक यांचे उपस्थितीत फिर्यादीस परत देण्यात आले आहे. यावेळी फिर्यादी यांनी पोलीसांनी खूप चांगले

Screenshot

सहकार्य केले, वेळेत तपास करुन आमचे सोने परत मिळवून दिले अशी प्रतिक्रिया देवून पोलीस

प्रशासानाचे आभार मानले.

दुस-या चोरीच्या गुन्हयांतील फिर्यादी तुषार अभंग व संतोष जगताप, रा. विडणी यांच्या विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी काही दिवसापुर्वी अज्ञात चोरटयाने नेले होत्या. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलीसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार निष्पन्न करुन चोरीस गेलेल्या मोटारी जप्त करण्यात आले आहेत.

Screenshot

आज रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत सुबनावळ, दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक यांचे उपस्थितीत फिर्यादीस परत दिला आहे. यावेळी फिर्यादी यांनी पोलीसांनी वेळेमध्ये तपास करुन आमच्या मोटारी परत मिळवून दिल्या अशी प्रतिक्रियादेवून देवून पोलीस प्रशासानाचे खूप खूप आभार मानले.

सदरची कामगिरी मा. निखिल पिंगळे सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर पोलीस अधीक्षक, मा. धन्यकुमार गोडसे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रशांत सुबनावळ सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, हनुमंत दडस यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!