जिंती येथील बिरोबा मंदिरातील चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांकडून २४ तासांत छडा; आरोपी अटकेत

फलटण टुडे वृत्तसेवा ( जिंती/फलटण , दि ०६ सप्टेंबर २०२६):-

फलटण तालुक्यातील जिंती येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिरात झालेली चोरी उघडकीस आणण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Screenshot


हरिष विठ्ठल कोळपे (रा. कोळपेवस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने जिंती येथील बिरोबा मंदिरातील पितळी समई, पितळी घंटा आणि इतर साहित्य असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Screenshot


पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार आणि प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने सूत्रे हलवली. तपास पथकातील पोलीस हवालदार पिसे, अडसूळ, पवार आणि पोलीस अंमलदार देशमुख यांनी संशयित आरोपी जय संजय वेदपाठक (वय २२, रा. पिंपळवाडी, ता. फलटण) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस पथकाने ५ सप्टेंबर रोजी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पिसे करत आहेत.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!