शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ व मंडई गणपती आयोजित भव्य दांडिया १५ ऑक्टोबरला; महिलांसाठी पैठणी आणि स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची लुटणूक!

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १३ ऑक्टोबर २०२६): –
नवरात्रोत्सवाच्या औचित्याने शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ आणि मंडई गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, शंकर मार्केट, फलटण येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे.


या दांडिया महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विविध गटांत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये ‘बेस्ट क्वीन’, ‘बेस्ट ड्रेपरी’ आणि ‘बेस्ट गर्ल चाईल्ड’ अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. याशिवाय, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिलांमधून विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्या महिलांना ३ आकर्षक पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.


हा भव्य दांडिया सोहळा किशोरसिंह नाईक-निंबाळकर (भैय्या) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. तरी फलटण शहर व परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी व गरबाप्रेमींनी या भव्य दांडिया महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ व मंडई गणपती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!