२५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघ ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी ६ कोटी रुपये उपलब्ध : आ.दिपकराव चव्हाण

फलटण दि.१० : २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावात रस्ते, गटारे, सभामंडप, सामाजिक सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय वगैरे कामांसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतुदी मधून आ.दिपकराव चव्हाण यांनी गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणेसाठी सुचविलेल्या कामांसाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या दि.८ ऑगस्ट च्या शासन निर्णयानुसार ६ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.
या कामांमध्ये १) तरडगाव ते सालपे रस्ता करणे १० लाख रुपये, २) तरडगाव ते चौंडी ओढा ते चव्हाणवाडी रस्ता करणे १० लाख रुपये, ३) इनाममळा, तरडगाव येथे अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, ४) माळेवाडी ग्रामपंचायत कार्यालय ते अंकुश सुळ घर रस्ता करणे ९ लाख रुपये, ५) खामगाव येथे नाभिक समाज सभामंडप बांधणे ८ लाख रुपये, ६) तांबवे येथे लक्ष्मीआई मंदिराजवळ सभा मंडप बांधणे ८ लाख रुपये, ७) काळज ते नांदल (मोरे माळ सावळा पाटील वस्ती मार्गे) रस्ता करणे ९ लाख रुपये, ८) चव्हाणवाडी येथे मुख्य रस्ता डांबरीकरण करणे ९ लाख रुपये, ९) पाडेगाव गावठाण ते शीवेचा मळा रस्ता करणे ९ लाख रुपये, १०) पंचबिघा गोखळी येथे मागासवर्गीय वस्ती मध्ये भूमीगत (अंडरग्राउंड) गटर बांधणे ९ लाख रुपये, ११) हणमंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयास संरक्षक भिंत बांधणे ९ लाख रुपये, १२) शिंदेनगर १५ दारे अनपटवस्ती ते देशमुखवस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, १३) सोनगाव बंगला अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, १४) साठे ग्रामपंचायत कार्यालय दुसरा मजला बांधणे १० लाख रुपये, १५) मठाचीवाडी ते खंडेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, १६) आसू घोरपडे वस्ती ते बोंगाणेवस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, १७) आदर्की बुद्रुक येथे एस. टी. बस स्टँड परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे ८ लाख रुपये, १८) हिंगणगाव येथे धुळोबा मंदिर शेजारी सभामंडप बांधणे ८ लाख रुपये, १९) नांदल लक्ष्मीदेवी मंदिर सभा मंडप बांधणे ८ लाख रुपये, २०) सासवड अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे ९ लाख रुपये, २१) कापशी नवामळा घनवट घराशेजारी मुख्य रस्ता ते तुळजाभवानी मंदिर ते नाना कदम, सोमनाथ कदम घर रस्ता करणे १० लाख रुपये, २२) नवामळा कापशी आप्पा कदम शेड ते संपत कदम घर रस्ता करणे १० लाख रुपये, २३) राजाळे बबन ठेंगील घर ते अंकुश जाधव घर रस्ता करणे ९ लाख रुपये, २४) दुधेबावी येथे चौंडी माता सभामंडप बांधणे ८ लाख रुपये, २५) राजुरी येथे कॅनॉल पूल ते युवराज जाधव वस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, २६) आंदरुड मसुगडेवस्तीकडे जाणारा रस्ता करणे ९ लाख रुपये, २७) नाईकबोमवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, २८) जिंती व्यायाम शाळेजवळ सभा मंडप बांधणे ६ लाख रुपये, २९) तिरकवाडी पाचीमळा फौजीनगर वडले रस्ता करणे ९ लाख रुपये, ३०) कुरवली बुद्रुक येथे सुळ वस्तीकडे जाणारा रस्ता करणे ९ लाख रुपये, ३१) खंडोबानगर पिंप्रद येथे रस्ता करणे ९ लाख रुपये, ३२) सांगवी कर्चेवस्ती ते कदमवस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, ३३) सोमंथळी सतीश यादव घर ते फणसे मळावस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, ३४) विडणी येथे रामचंद्र अभंग वस्ती ते नाना अभंग वस्ती रस्ता करणे ९ लाख रुपये, ३५) विडणी येथे शिवाजी महाराज मठ ते गायकवाड वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ३६) कापशी येथे सामाजिक सभागृह बांधणे ८ लाख रुपये, ३७) खुंटे येथे गावठाण अंतर्गत कृणाल खलाटे घर ते खंडोबा मंदिर रस्ता करणे ९ लाख रुपये, ३८) बिरदेवनगर, जाधववाडी (फलटण) येथे गट नंबर ५० अ खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे ५० लाख रुपये, ३९) पेरुचा मळा, झिरपवाडी येथे ओढ्यावर मोरी बांधकाम करणे ७ लाख रुपये, ४०) लक्ष्मी मंदिर, वडगाव सभामंडप बांधणे ७ लाख रुपये, ४१) मुंजवडी गावठाण अंतर्गत स्मशानभूमी ते झेंडे घर, बौद्ध समाज मंदिर अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, ४२) जिंती १६ फाटा ते राजाळकी रस्ता करणे ९ लाख रुपये, ४३) हनुमान मंदिर फडतरवाडी ते चंदरराव फडतरे घर रस्ता करणे ९ लाख रुपये, ४४) गोळेगाव (ठाकुरकी) अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, ४५) वाखरी (जोरगाव) येथे बापू जाधव घर ते प्रा.शाळा रस्ता करणे ९ लाख रुपये, ४६) आळजापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे ७ लाख रुपये, ४७) अक्षतनगर कोळकी येथे महामुनी घर ते कदम घर, राजगुडा घर ते घोरपडे घर व गणेश मंदिर ते निंबाळकर घर काँक्रिट रस्ता करणे ५ लाख रुपये, ४८) नाना नानी पार्क कोळकी संरक्षक भिंत बांधणे ९ लाख रुपये, ४९) कोळकी बुवासाहेब नगर ते कांबळे घर गटर्स करणे ९ लाख रुपये, ५०) वाठार निंबाळकर येथे दिलीप ननावरे घर ते संजय ननावरे घर रस्ता करणे ९ लाख रुपये, ५१) वाखरी येथे गट क्रमांक ११३६ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे ९ लाख रुपये, ५२) जिंती येथे बिरोबा मंदिर तांबे वस्ती पोहोच रस्ता करणे ९ लाख रुपये, ५३) बांदलवस्ती निंभोरे अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, ५४) साखरवाडी येथे फुलेनगर ते काळूबाई चौक रस्ता करणे ९ लाख रुपये, ५५) घिगेवाडी, ता.कोरेगाव येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे १० लाख रुपये, ५६) पिंपोडे बुद्रूक, ता.कोरेगाव परगणा वस्ती घुमाई देवी मंदिर सभामंडप व परिसर सुशोभीकरण करणे १० लाख रुपये, ५७) भावेनगर, ता.कोरेगाव येथे शाळा संरक्षक भिंत बांधणे ५ लाख रुपये, ५८) तळीये, ता.कोरेगाव येथे गटर्स बांधणे ८ लाख रुपये, ५९) जाधववाडी, ता.कोरेगाव येथे अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, ६०) नायगाव, ता.कोरेगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सभा मंडप बांधणे ८ लाख रुपये, ६१) सोनके, ता.कोरेगाव येथे सभा मंडप बांधणे १० लाख रुपये, ६२) येळेवस्ती, भावेनगर, ता.कोरेगाव येथे सभा मंडप बांधणे ८ लाख रुपये, ६३) चौधरवाडी, ता.कोरेगाव येथे अंतर्गत रस्ता करणे ९ लाख रुपये, ६४) पिंपोडे बुद्रूक, ता.कोरेगाव येथे लेंभे भावकी परडेपड रस्ता, तडवळे रोड लगत काँक्रिटीकरण करणे ९ लाख रुपये.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!