फलटण | फलटण शहरासह उपनगरामधील किरकोळ किंवा छोट्या स्वरूपात घडणाऱ्या दुर्घटनांसाठी व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फलटण नगर परिषदेच्या अग्निशमन दलामध्ये दोन अग्निशमन बुलेट दाखल झाली आहे. या अग्निशमन बुलेटचे पूजन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या दाखल झालेल्या अग्निशमन बुलेट मध्ये 2 फोम सिलेंडर, DCP गॅसचा सिलेंडर बसवण्यात आला आहे. या अग्निशमन बुलेटचा उपयोग हा लहान आज विझवण्यासाठी होणार आहे